मुंबई - 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका भागामुळे रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी आणि अपूर्व मखीजा हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता या चौघांवर अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच यानंतर या चौघांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अपूर्वा मखीजा आणि आशिष चंचलानी यांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. याशिवाय रणवीर आणि समय यांना दोनदा समन्स मिळाल्यानंतरही ते पोलिसांपर्यंत गेले नाहीत. सध्या समय हा देशाबाहेर असल्यानं त्यानं काही वेळ या चौकशीसाठी मागितला आहे. तर दुसरीकडे रणवीरनं पोलिसांना त्याच्या घरी येऊन त्याचे बयान नोंदवण्यास सांगितलं होतं, मात्र त्याचं याबाबत ऐकलं गेलं नाही. सध्या रणवीर आणि समय हे दोघेही महाराष्ट्र सायबर सेलच्या संपर्कात आहेत.
रणवीर अलाहाबादियावर पुन्हा एकदा झाली टीका : दरम्यान याप्रकरणी रणवीरवर अनेकजण टीका करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अनिरुद्धाचार्य हे रणवीर अलाहाबादियाबद्दल बोलताना दिसत आहे. अनिरुद्धाचार्य यांनी आता रणवीरवर चांगलीच टीका केली आहे. पालकांबद्दल चुकीचे शब्द रणवीरनं वापरल्यानं रणवीरला अनेकजण दोषी असल्याचं म्हणत आहेत. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनिरुद्धाचार्य यांनी म्हटलं, 'अलाहाबादी नावाचा एक मुलगा आहे, त्यानं आई -वडिलांसाठी चुकीचे शब्द वापरले आहेत. कल्पना करा, आजची पिढी इथे जात आहे. मी त्याचे ते... निरर्थक शब्द म्हणू शकत नाही.'
अनिरुद्धाचार्य यांच्या व्हिडिओवर यूरर्सनं दिल्या प्रतिक्रिया : दरम्यान अनिरुद्धाचार्य यांच्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'बाबाजी काही बोलू नका, तुम्हाला पॉडकास्टमध्ये बोलणार नाही.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'गुरुजी देखील 'इंडियाज गॉट लेटेंट' शो पाहातात.' आणखी एकानं लिहिलं, 'गुरुजीनं आता मीठ चोळलं आहे.' तसेच केंद्र सरकारनं अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कंटेंटवरील कडकपणा वाढवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं की, ओटीटी प्लॅटफॉर्मना नियमांचे पालन करावे लागेल. तसेच कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अश्लील किंवा आक्षेपार्ह कंटेंट दाखविण्यास दंडनीय गुन्हा मानला जाईल.
हेही वाचा :
- रणवीर अलाहाबादियाविरुद्ध जयपूरमध्ये गुन्हा दाखल, सर्वोच्च न्यायालयात होईल आज सुनावणी...
- जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर रणवीर अलाहाबादियानं पुन्हा मागितली माफी, कुटुंबाबद्दल केली चिंता व्यक्त...
- रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त विधानानंतर पुन्हा जबाब नोंदविण्यासाठी अपूर्वा मुखीजा मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये हजर...