Narak Chaturdashi : नरक चतुर्दशी आणि दिवाळी पाडवाचे जाणुन घेऊया महत्व, काय सांगतात पंडित वसंतराव गाडगीळ - Diwali Padwa
🎬 Watch Now: Feature Video
दिवाळीत (Diwali Celebration) प्रत्येक सणाला एक धार्मिक महत्त्व असून प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. आज आपण दिवाळीच्या सणांपैकी एक असलेल्या नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि दिवाळी पाडव्याचे (Diwali Padwa) काय महत्त्व आहे, हे जाणून घेणार आहोत. आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते. तसेच दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. नरक चतुर्दशी आणि दिवाळी पाडव्याचे काय महत्त्व आहे. याबाबत पंडित वसंतराव गाडगीळ ( Pandit Vasantrao Gadgil) यांनी माहीती दिलेली आहे, बघुया काय म्हणतात ते. importance of Narak Chaturdashi and Diwali Padwa
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST