Chhagan Bhujbal : वाटेल ते बोलून लोकांना किती पेटवणार आहात; चंद्रकांत पाटलांना छगन भुजबळांचा सवाल - छगन भुजबळ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17192690-thumbnail-3x2-bhujbal.jpg)
पालकमंत्री चंद्रकांत पाटील Guardian Minister Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक प्रकरणी तीन जणांवर इतर कलमासह 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न हे कलम लावण्यात आले आहे. यारून विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ Guardian Minister Chandrakant Patil यांनी चंद्रकांत पाटलांवर टोलेबाजी Gangs on Chandrakant Patals केली. चंद्रकांत पाटील हे धडधाकट आहेत, त्यांना शाई फेकल्याने काय होणार? शाईफेक प्रकरणी तिघांवर खुनाचा प्रयत्न हे कलम लावले हे समजण्याच्या पलीकडे आहे. वाटेल ते बोलून आपण सुद्धा लोकांना किती पेटवणार आहात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, शाई फेक करणारा फुले, शाहू आंबेडकरांचा पाईक आहे. कुणाच्या जीवाला धोका निर्माण होईल अस वागू नये हे ठीक आहे. पण, वाटेल ते बोलून आपण सुद्धा लोकांना किती पेटवणार आहोत, शाई फेक प्रकरण अनेक वेळा झाले. नाशिक ला साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली. शाई पुसून त्यांनी भाषण केले. शाई फेकणाऱ्याला पकडले, ते निघून गेले. चंद्रकांत पाटील यांच्यावर ज्यांनी शाई फेकली त्यांच्यावत 307 कलम लावले. खुनाचा प्रयत्न? मला हे कळलंच नाही. चंद्रकांत पाटील हे धडधाकट आहेत. त्यांना शाई फेकल्याने काय होणार, मिश्किल टोला लगावला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू यांच्या विरोधात बोलतील, तो आपला अशी भुमीका भाजपची दिसते आहे. त्यामुळे आपण ही त्यांना सांभाळून घेतले पाहिजे. अस छगन भुजबळ म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST