thumbnail

Himanshu Rauthan Journey : हिमाचलमधील अवलिया पर्यटक; पदभ्रमंती करत गाठतोय १२०० किमीचा खडतर प्रवास

By

Published : May 21, 2022, 10:02 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

रुद्रप्रयाग- जिल्ह्यातील बासुकेदार तहसीलच्या रायडी गावात राहणारा २५ वर्षीय तरुण हिमांशू रौथन ( Himanshu Rauthan journey ) याने त्याच्या गावापासून लेह लडाखपर्यंत १२०० किमीचा खडतर प्रवास करण्याचा निर्णय ( wanderer Himanshu Rauthan ) घेतला आहे. कोणी कल्पनाही करू शकत नाही, असे ध्येय ठेवून त्याने घर सोडले आहे. गेल्या 14 मे पासून सुरू झालेला हा साहसी पायी प्रवास पोंटा साहिब येथपर्यंत पोहोचला आहे. रायडी गावातील माजी सैनिक बिरपाल सिंग रौथन यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा हिमांशू आपल्या गावापासून लेह लडाखपर्यंत सुमारे 1200 किमी चालण्याच्या ( Himanshu Rauthan walking 1200 km ) साहस पर्यटनासाठी निघाला आहे. परिस्थिती अनुकूल असल्यास पुन्हा दुसऱ्या पदयात्रेची तयारी ( Himanshu Rauthan the youth of Rayadi village ) करणार आहे. हिमांशूचे प्रारंभिक शिक्षण गौरी मेमोरियल इंटर कॉलेज अगस्त्यमुनी, लॅन्सडाउन, मुंबई, दिल्ली इत्यादी ठिकाणी झाले. दिल्लीत राहून छंद म्हणून चित्रपट, फोटोग्राफी, यूट्यूब चॅनल इत्यादी गोष्टी त्याने आत्मसात केल्या आहेत. अभ्यासासोबतच त्याने नोकरीही केली. जेव्हा कोविड-19 चा धोकादायक टप्पा आला तेव्हा त्याला मार्च 2020 मध्ये दिल्लीहून घरी परतावे लागले होते. अखेरीस त्याला वाटले की आपले जीवन प्रवासासाठी आहे. मित्रांसोबत त्याच्या वडिलांनीही त्याला साथ दिली. यामुळे त्याचा उत्साह वाढला. त्याच्या पालकांच्या परवानगीने त्याने हे अवघड परंतु साहसी कार्य करण्याचे ठरवले. 14 मे रोजी सकाळी आपल्या पालकांच्या आशीर्वादाने घरातून पायी प्रवास करून तो श्रीनगरला पोहोचला. त्यानंतर देवप्रयाग, बियासी, ऋषिकेश, डेहराडून मार्गे गुरुवारी पोंटा साहिबला पोहोचला. कबड्डी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष, रायडी गावचे सेवानिवृत्त शिक्षक नरेंद्रसिंग रौठाण यांनी हिमांशूचे अभिनंदन करताना सांगितले की, ही केवळ रायडी नसून रुद्रप्रयाग जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. हिमांशूच्या यशातून इतर तरुणही प्रेरणा घेतील, असे ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.