Heavy Rain In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पत्रा चाळीत शिरले पाणी - पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/27-09-2023/640-480-19624240-thumbnail-16x9-sachalelepani.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Sep 27, 2023, 10:44 PM IST
पिंपरी चिंचवड (पुणे) Heavy Rain In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पत्रा चाळीत राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ( Pune heavy rain) पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. (rain water in citizens houses) पावसामुळे शहरातील पिंपरी परिसरातील लिंक रोड येथील पत्रा चाळीत लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. (rain water entered Patra chal) यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.