Raid On Vaidyanath Sugar factory : जीएसटी विभागाचा दणका, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर छापा - Raid on Vaidyanath Cooperative Sugar Factory

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 13, 2023, 5:27 PM IST

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर आज सकाळीच जीएसटी विभागाचा छापा पडला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच या कारवाईवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या सहा ते सात वर्षांपासून कारखाना बंद असून तो तोट्यातदेखील आहे. त्यातील बहुतांशी कर्मचारी हे कामावरून काढले देखील आहेत. मात्र अचानक ही कारवाई झाल्याने ते अंतर्मुख करणारी असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. कारखान्याचे बरेच कर्ज फेडले. मात्र सध्या कारखाना बंद आहे. या अधिकाऱ्यांना सहकार्य करत असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांनी छापेमारी का केली, याची पार्श्वभूमी सांगितली. त्या म्हणाल्या, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना 6-7 वर्षांपासून तोट्यात आहे. तो कसा तरी आम्ही चालवत आहोत. या कारणासाठी आम्ही काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी 4-5 कारखान्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आम्हाला जीएसटी भरावा लागेल, कर्ज बाकी आहे. कारखान्यावर जवळपास अडीचशे कोटींचे कर्ज आहे. आम्ही 152 कोटींचे कर्ज फेडले आहे. आता पुन्हा या आजारी साखर कारखानदारांना मदत करण्याची विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.