VIDEO : नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांनी केले करुणा त्रिपदींचे सामूहिक गायन - छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : गुरुमंदिर परिवार आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर यांच्यावतीने शिव जयंती आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने आज नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी रचित, करुणा त्रिपदी सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी नागपुरातील विविध शाळांचे तीन हजार पेक्षा अधिक विद्यार्थी हजर होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी करुणा त्रिपदी सामूहिक गायन केले. कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करुणा त्रिपदीचे सामूहिक गायन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सद्गुरुदास महाराज सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. येवेळी बोलताना सद्गुरुदास महाराजांनी सांगितले की, कोरोनाचा कठीण काळ संपल्यानंतर गेल्या १ वर्षापासून विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्रातर्फे नागपुरातील विविध शाळांमध्ये शिकणारे हजारो विद्यार्थी, नित्याने साप्ताहिक करुणा त्रिपदिचे गायन करीत आहेत.