Video अजबच, नवरदेवाप्रमाणे निघाली शेळ्या, मेंढ्यांची रथातून मिरवणूक
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजारा निमित्ताने आटपाडी शहर शेळ्या- मेंढ्या व मेंढपाळ यांच्या गर्दीने फुलून गेले होते. आश्चर्य म्हणजे लग्नामध्ये नवरदेवाची रथातून ज्याप्रमाणे मिरवणूक काढली जाते, त्याच पद्धतीने शेळ्या-मेंढ्यांची मिरवणूक (Goats and sheep Procession) आटपाडी शहरामध्ये निघाली होती. सजवलेल्या मेंढ्या, फटाक्यांची आतिषबाजी, बेधुंद नाचणारे मेंढपाळ असे चित्र यामुळे आटपाडीच्या रस्त्यांवर पहायला मिळाले आहे आणि या शेळ्या मेंढ्यांची मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. आटपाडी येथे शेळ्या-मेंढ्यांच्या भरणारा बाजार हा महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी- विक्रीसाठी या ठिकाणी शेळ्या व मेंढ्या दाखल होत असतात. यंदाही जवळपास आठ हजारहुन अधिक शेळ्या मेंढ्या दाखल झाल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST