Ganpati Visarjan 2023 : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची ड्रोनद्वारे घेतलेली दृश्ये; पहा व्हिडिओ - अनंत चतुर्दशी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/28-09-2023/640-480-19629445-thumbnail-16x9-ganpati-visarjan-2023.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Sep 28, 2023, 3:13 PM IST
पुणे Ganpati Visarjan 2023 : आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यावर दहा दिवस नागरिकांनी मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केली. आता आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुक काढण्यात येत आहे. आज अनंत चतुर्दशीला सकाळपासूनच महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीयं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पुण्याचा मानाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालीयं. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले आहेत. पुण्याच्या या विसर्जन मिरवणुकीत मोठा उत्साह पाहायला मिळतोय. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील गणपती विसर्जन मिरवणुकीची ड्रोनद्वारे घेतलेली दृष्ये खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी... (Drone footage of Ganapati immersion procession)