Ganja Seized in Nagpur : डीआरआयकडून 42 लाखांचा गांजा जप्त, तस्करी करण्याकरिता वापरली अजब युक्ती - Ganja Seized in Nagpur

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 7:33 PM IST

Updated : Sep 17, 2023, 7:41 PM IST

नागपूर Ganja Seized in Nagpur  : महसूल गुप्तचर संचालनालयानं नागपूरमध्ये मोठी कारवाई केलीय. डीआरआयने ट्रॅक्टरच्या गुप्त डब्यात लपवून ठेवलेला गांजा जप्त केलाय. नागपूर डीआरआयच्या अधिकार्‍यांनी 16 सप्टेंबरच्या पहाटे नागपूरजवळील मौदा टोल येथे ट्रॉलीसह जोडलेला एक ट्रॅक्टर थांबवला. त्याची बारकाईनं तपासणी केली. त्याला ट्रॉलीच्या खाली एक गुप्त डबा असल्याचं दिसून आलं. या डब्यात 100 पॅकेज होते. त्यात 211 किलो गांजा होता. त्याची किंमत सुमारे 42 लाख 20 रूपये होती. या प्रकरणी या वाहनातून प्रवास करणाऱ्या दोघांना पकडण्यात आलंय. त्यानंतर त्यांना एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आलीय. पुढील तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. (dri seized 211 Kgs Ganja in Nagpur) दिवसेंदिवस अमली पदार्थांचा शहरात वावर वाढलाय. 

Last Updated : Sep 17, 2023, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.