Ganeshotsav 2023: गणपती बाप्पा मोरया! पाहा, ढोल ताशांच्या गजरात वृंदावनच्या राजाचं ठाणे नगरीत जल्लोषात स्वागत - वृंदावनच्या राजाचं मोठ्या थाटात आगमन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 12, 2023, 5:13 PM IST
ठाणे Ganeshotsav 2023 : ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत सोमवारी रात्री वृंदावनच्या राजाचं मोठ्या थाटात आगमन झालंय. बाप्पाचं भव्य रूपाचं पहिलं दर्शन डोळ्यात साठवून घेण्यासाठी बाप्पाच्या भक्तांनी अलोट गर्दी केली होती. बाप्पाच्या आगमनाची सलामी देण्यासाठी मुंबईचं सुप्रसिद्ध ढोल ताशा पथक यावेळी वृंदावन सोसायटीत शेकडो वादकांसह उपस्थित होतं. सर्वच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून येतेय. कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत. बाप्पाची आरास लवकरात लवकर तयार करून बाप्पाला विराजमान करण्यासाठी लवकरच मुर्ती आणून ठेवल्या जातात. वृंदावन सोसायटीच्या गणेशोत्सवाची यावर्षीची विशेष बाब म्हणजे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रामुख्यानं तरुण मंडळी आहेत. या स्वागत यात्रेमध्ये तरुणींचा देखील मोठा सहभाग बघायला मिळायला. वृंदावनच्या बाप्पाचा मुक्काम दहा दिवसांचा आहे. सर्वांनी बाप्पांच्या दर्शनाला आवर्जून यावं, असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुमित सुर्वे यांनी केलंय.