Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात गाड्या सोडल्याने स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी; पहा व्हिडीओ - Ganeshotsav Pune Swargate bus station

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 4:26 PM IST

Updated : Sep 17, 2023, 5:41 PM IST

पुणे Ganeshotsav 2023 : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे.  ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. चार तास प्रवाशांना गाड्या उपलब्ध होत नसल्यानं प्रवासांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.  एसटी प्रशासनाकडून उपायोजना करत असल्याचं सांगतंय.  गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्यानं एसटीकडून कोकणात मोठ्या प्रमाणात गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या इतर भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांना गाड्या उपलब्ध होत नसल्याचे चित्र सध्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात दिसतंय. पुण्याहून सातारा, कोल्हापूर, सांगलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वाट पाहत बसावं लागत आहे.  गाड्या नसल्याचं प्रवासी सांगत आहेत. यावर एसटी महामंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलयं. कोकणातील रायगड विभागात भरपूर गाड्या सोडल्याने ही गर्दी झाली असून, यावर उपाययोजना सुरु असल्याच सांगितलं जातंय. तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक आगारातून गाड्या मागवल्या आहेत. यामुळं दुपारपर्यंत प्रवाशांची गर्दी कमी होईल, असं एसटी महामंडळाचे आगार प्रमुख सुरवसे यांनी सांगितलंय. शनिवार, रविवारच्या सुट्ट्या आणि दोन दिवसानंतर गणेशोत्सव तसेच गौरी गणपतीच्या सुट्ट्यांमुळे अनेकजण घरी जात आहेत.  त्यामुळे स्थानकात प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र आहे.
 

Last Updated : Sep 17, 2023, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.