Ganesh Visarjan 2023 : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत शहाजी बापुंच्या 'त्या' डायलॉगवरून बॅनरबाजी; पहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणपती बाप्पाला कोल्हापूरकरांकडून निरोप देण्यात येत आहे. कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीच्या पूजनाने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी मान्यवरांच्या उपस्थित सुरुवात झाली. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मिरवणूक मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या विसर्जन मिरवणूकीत शहाजी बापूंच्या त्या डायलॉगवरून शहरातील विकासाच्या प्रश्न मांडून लक्ष वेधण्यात आले. विसर्जन मिरवणुकीला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीय. मात्र रात्री 12 नंतर साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी असणार आहे. त्यामुळं सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर सन्नाटा असणार आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस दल कार्यरत असून नियमांचे उल्लंघन झाल्यास सार्वजनिक गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलाय. तसंच विसर्जन मार्गावर सुरक्षेच्या दृषंचीनं 66 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.