Ganesh Visarjan 2023 : विसर्जन काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला सरसावले महाविद्यालयीन विद्यार्थी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 10:51 AM IST

मुंबई Ganesh Visarjan 2023 : मुंबईत दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. अनेक मानाच्या भव्य गणेश मूर्तींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. यात तेजूकायाचा महाराजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा चा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या मंडळांना भेटी देत असतात. मात्र, ज्या गणेश भक्तांना आपल्या बाप्पाचं दर्शन घेता आलं नाही ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देतात. मुंबईतून अनेक गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलीस आणि महानगरपालिकेसमोर मोठ आव्हान असतं. अशाच आव्हानाला तोंड देताना पोलिसांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वेच्छेनं मोलाची साथ दिलीय. 

पोलीस मित्र बनून पोलिसांना मदत : एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचे 40 विद्यार्थी पोलीसांच्या मदतीसाठी आता रस्त्यावर उतरले होते. पोलीस मित्र म्हणून त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत केलीय. गिरगाव चौपाटीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भवन्स महाविद्यालयाचे हे विद्यार्थी असून सकाळी जेव्हा मिरवणुकीला सुरुवात होते तेव्हापासून ते अगदी शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि एकूणच या गणपती विसर्जनाच्या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, या विद्यार्थ्यांनी तहान-भूक विसरुन काम केलं.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.