Ganesh Festival 2023: पाताळ भुवनेश्वर गुहेत गणेशाचे मस्तक पडल्याची आख्यायिका, पहा हे ठिकाण - पिथौरागड उत्तराखंड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 3:21 PM IST

Updated : Sep 19, 2023, 3:34 PM IST

पिथौरागड (उत्तराखंड) Ganesh Festival 2023: देशभरात गणेश चतुर्थी साजरी होत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पण आज आम्‍ही (Ganesha severed head) तुम्हाला अशाच श्रीगणेशाच्या ठिकाणाची ओळख करून देणार (Patal Bhubaneswar Ganesha) आहोत, जेथे श्रीगणेशाचं मस्तक पडल्याची आख्यायिका आहे.  आजही हे स्थान पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. (Pithoragarh Uttarakhand)  उत्तराखंडमधील अनेक लेणी पूर्वीपासून आध्यात्मिक श्रद्धेचे केंद्र आहेत. यात अनेक रहस्ये आहेत. लेणी हे लोकांच्या प्रगाढ श्रद्धेचे केंद्र आहे. पिथौरागडच्या गंगोलीहाट तहसीलमध्ये स्थित पाताळ भुवनेश्वर गुहा त्यापैकी एक आहे. उत्तराखंडच्या कुमाऊं विभागात असलेल्या या गुहेत तेहतीस कोटी देवी-देवतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. या गुहेत श्रीगणेशाचे छिन्नविछिन्न शीर पडल्याची पौराणिक मान्यता आहे.  आख्यायिकेनुसार, भगवान शिव क्रोधित झाले.  त्यांनी गणेशाचे मस्तक शस्त्रानं उडविलं. त्यानंतर माता पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवानं हत्तीच्या पिल्लाचं तोंड लावून गणेशाला नवजीवन दिलं. असं मानलं जातं की,  भगवान शिवानं तोडलेले डोके थेट गंगोलीहाट तालुक्यातील पाताळ भुवनेश्वर गुहेत पडले. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या लेणीला भेट देण्यासाठी येतात.  या गुहेचे वर्णन स्कंद पुराणातील 'मानस खंड' मध्येही आढळते.

Last Updated : Sep 19, 2023, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.