Ganesh Festival 2023 : कुलस्वामिनी प्रतिष्ठानने साकारला शिवराज्याभिषेक सोहळा, शेतीत राबणारा गणपती ठरतोय आकर्षण - गणेश फेस्टिवल 2023
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 27, 2023, 6:49 PM IST
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Ganesh Festival 2023 : गणेश उत्सवाचा उत्साह आता वाढला आहे. अनेक मंडळांनी आकर्षण देखावे साकारले आहेत. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सिडको येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे (Kulaswamini Pratishthan) यंदा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivarajabhishek ceremony) साकारण्यात आला आहे. एक महिना अथक प्रयत्नांनी जवळपास दोन लाख रुपये खर्च करून मनमोहक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे. तर कृषीप्रधान राज्य व्हावे याकरता बाप्पा शेतकऱ्यांच्या बाजूने (Ganpati working in field) आहे, असा विश्वास दर्शवणारा महाराष्ट्राचा नकाशा देखील साकारण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव विलास कोरडे यांनी दिली. महाराजांचा सिहांसनावर बसलेला पुतळा बसवण्यात आला. त्यांच्या बाजूला राजमाता जिजाऊ, बाल रूपात छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह प्रधान आणि महिला दाखवण्यात आल्या. तर राजवाड्याच्या दालनात त्यांचे मंत्रिमंडळ आणि मावळ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे दरबारात त्यांच्यासोबत असलेले मुस्लीम सरदार आणि राज्याभिषेक सोहळ्यात आलेले इंग्रज देखील दाखवण्यात आले आहेत. हा देखावा सादर करण्यासाठी पंधराजण तब्बल महिनाभर दिवसरात्र काम करत होते. त्या माध्यमातून लुप्त असलेल्या चित्रकारांना रोजगार देण्यात आला. किल्ल्याची प्रतिकृती तयार करताना अनेक अडचणी होत्या; मात्र त्या बाजूला करून हुबेहूब सोहळा साकारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अलका कोरडे यांनी दिली.