Ganesh Festival 2023 : साहसी खेळ, ढोल ताशांच्या गजरात ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’तर्फे बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना - Ganesh Festival 2023

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 7:29 PM IST

पुणे Ganesh Festival 2023 : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये साहसी खेळ, तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर पाच ढोल ताशा पथक तसंच कलाकारांचे पथक (Omkar Mahal Pune), त्यात सहभागी झालेले कलाकार यांचा समावेश होता. त्या कलाकारांच्या माध्यमातून ढोल ताशा वाजवत असताना नागरिकांकडून मिळणारी दाद अशा उत्साही वातावरणात गणेशांची आगमन मिरवणूक काढण्यात आली. (Shrimant Bhausaheb Rangari Trust)
भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक बैलगाडीवरून काढण्यात आली. यावेळी पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल यांनी या बैलगाडीचं सारथ्य केलं. भव्य, दिव्य देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने यंदा काल्पनिक ‘ॐकार महाल’ हा देखावा साकारण्यात आला आहे. भव्य महालाच्या देखाव्यांची परंपरा असलेल्या ट्रस्टने ‘बाप्पा’ याच ॐकार महालात विराजमान होणार असल्याची माहिती विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने दरवर्षी भव्य महालाच्या प्रतिकृती असलेले देखावे साकारले जातात. यंदाही असाच राजेशाही थाटमाट असलेला ‘ॐकार महाल’ हा काल्पनिक देखावा साकारण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.