Ganesh Festival 2023: दगडूशेठ गणपतीला १३१ लिटर शहाळ्याचे आईस्क्रीम प्रसाद स्वरूपात अर्पण - गणेश फेस्टिवल 2023
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 24, 2023, 8:26 PM IST
पुणे Ganesh Festival 2023: गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून पुण्यातील गणेश उत्सव पाहण्यासाठी जगभरातून भाविक पुण्यात येत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव पाहण्यासाठी गर्दी होत आहे. (Offering Ice Cream to Ganapati) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganapati) मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. तसेच आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोठ्या प्रमाणावर मोदक तसेच विविध वस्तू हे अर्पण केले जात आहेत. आज किगा समुहा तर्फे डायरेक्टर गणेश गोसावी व किरण साळुंके यांनी आज १३१ लिटर शहाळ्याचे आईस्क्रीम प्रसाद स्वरूपात श्रीमंत दगडूशेठ चरणी अर्पण केले आहे. बाप्पांच्या चरणी आगळा वेगळा प्रसाद अर्पण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही राज्यात अनेक गणपती देवळात बाप्पांंना मोदकाचा आणि लाडवांचा प्रसाद वितरित करण्यात आला आहे.