Movement Of Tiger : उमरेड कोळसा खदान भागात रात्री वाघाचा मुक्त संचार - at night in
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर जिल्ह्यातील उमरेड कोळसा खदान या भागात रात्री एका वाघाचा मुक्त संचार दिसून आला आहे. अचानक वाघोबा प्रत्यक्षात समोर आल्याने अनेकांची भांभेरी उडाली तर अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये वाघाची अगदी जवळून रेकॉर्डिंग केली त्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.. वाघ खदान या भागातुन जाणाऱ्या वाहनांच्या समोर काही काळ उभा झाला होता. या भागात रात्रभर वाहनांची वर्दळ असते. परिसरात वाघाचा संचार दिसून आल्याने नागरिकांसह कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरेडच्या शेजारीच कराडलाचे जंगल आहे. तेथील वाघ भटकंती करत उमरेड कोळसा खदान परिससरात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाघाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यातच आता करांडला जंगलात वाघांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा पर्यटकांची संख्या वाढणार आहे.( Movement Of Tiger )