Wild Elephant Attack: जंगली हत्तीनं केलेल्या हल्ल्यात वन कर्मचारी ठार, पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

गडचिरोली Wild Elephant Attack : वडसा वन विभागात येत असलेल्या आरमोरी वनपरिक्षेत्रात पळसगाव वन कक्षात हत्तीच्या हल्ल्यात वन विभागाचा वाहन चालक जागीच ठार झालाय. ही घटना साडेचार वाजताच्या सुमारास घडलीय. आरमोरी वन परिक्षेत्रात पळसगाव वन कक्षात जंगली हत्ती आल्याचं गावकऱ्यांनी वन विभागाला कळविलं. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक आणि वन कर्मचारी जंगली हत्तींना पळवून लावण्याचा प्रयत्न करीत होते. बिथरलेले हत्ती सैरावैरा पळू लागले. त्यावेळी शेकडो स्थानिक नागरिक कर्मचारीही हत्तींना परतून लावत होते. वाहनचालक मृतक गाडी बाजूला ठेवून समोरून पाहत होता. अचानक जंगलातून त्यांच्या दिशेनं जंगली हत्ती समोर आला. त्याच्या जवळील नागरिक पडून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, त्या ठिकाणी वाहन चालक सुधाकर आत्राम खाली पडला. हत्तीनं वाहन चालकाचा फुटबॉलच केला. वाटेल त्या दिशेने आदळआपट करून त्याचे लचके तोडले. त्यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी नागरिकांनी जोरजोरानं आरडाओरड केली. रानटी हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले, मात्र वाहनचालकाचा या हल्ल्यात मृत्यु झाला. ( forest staff killed wild elephant attack) 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.