Youth 20 Summit: ऋषिकेशमध्ये योगाने युथ 20 समिटला सुरुवात, 20 देशांतील तरुणांचा सहभाग - Y20 Summit in Rishikesh

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 4, 2023, 5:06 PM IST

डोईवाला (उत्तराखंड) : देश-विदेशातील 28 जणांची टीम जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचली. परदेशी पाहुण्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. परदेशी पाहुण्यांनीही उत्तराखंडच्या ढोलवर चांगलाचा ठेका धरला. खरं तर 4 आणि 5 मे रोजी ऋषिकेश एम्समध्ये होणाऱ्या Y20 शिखर परिषदेसाठी देश-विदेशातील प्रतिनिधी जॉलीग्रांट विमानतळावर पोहोचले. पाहुण्यांचे उत्तराखंडचा सांस्कृतिक वारसा टिका लावून आणि रुद्राक्षाची माळ घालून स्वागत करण्यात आले. Y20 बैठकीसाठी 18 तरूण USA मधून आणि 10 तरुण भारतातील विविध राज्यातून आले आहेत. ऋषिकेश येथील एम्समध्ये दोन दिवस सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. सांस्कृतिक विभागाच्या सांस्कृतिक पथकाने ढोल दमौन, रणसिंगा आणि उत्तराखंडी लोकनृत्य आणि लोकगीतांसह सादरीकरण केले. असे रंगतदार स्वागत पाहून परदेशी पाहुणेही उत्तराखंडच्या लोकसंगीत आणि लोकनृत्याने नाचू लागले. परदेशी पाहुण्यांमध्ये 18 तरुण पाहुणे अमेरिकेतील आहेत आणि उर्वरित 10 भारतीय आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.