First Victim of Measles : वसईत गोवरचा पहिला बळी, बालकांना द्या योग्य वेळी गोवर प्रतिबंधात्मक लस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 23, 2022, 5:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

विरार वसई विरार महानगरपालिका हद्दीत नालासोपाऱ्याच्या पेल्हार परिसरात राहणाऱ्या, एक वर्षाच्या बालकाचा गोवर च्या प्रादुर्भावाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या बालकाला गोवरची लागण झाल्यानंतर, 14 नोव्हेंबर रोजी त्याला उपचारासाठी मुंबई तील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आठ दिवसांनी 22 नोव्हेंबरला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू First victim of measles in Vasai झाला. वसईत गोवरचा पहिला बळी गेल्याने एकच खळबळ माजली असून; वसई पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. लहान बाळाला ताप येणे, अंगाला खाज येणे या सारखी गोवरची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी वेळ न घालवता मुलांची माहिती पालिकेला द्यावी; जेणेकरून मुलांवरं योग्य उपचार करता येतील, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.