मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आज राज्यपालांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक तसंच नेते विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि इतर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन करण्यासंदर्भातील पत्र सुपुर्द केलं.
राज्यपालांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दावा दाखल केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे यासंदर्भातील पत्र राज्यपालांना दिलं. त्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ कुणा-कुणाला दिला जाणार याची माहिती संध्याकाळी दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. आपण आजपर्यंत तिघांनी मिळून सर्व निर्णय घेतले. त्यामुळे यापुढेही आपण एकत्रच निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
#WATCH | Shiv Sena chief Eknath Shinde, BJP leader Devendra Fadnavis, NCP chief Ajit Pawar at Raj Bhavan in Mumbai to stake claim to form the government in the state.
— ANI (@ANI) December 4, 2024
Devendra Fadnavis to take oath as CM of Maharashtra tomorrow, 5th December pic.twitter.com/HTjM9ZuqFi
यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी यापुढेही ते सर्व निर्णय घेण्यासाठी आपल्याला सहकार्य करत राहतील. त्यांना मंत्रिमंडळात येण्याची विनंती केली आहे. तेही आपल्या सोबत असतील अशी आशा यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे.
#WATCH | Mumbai: Maharashtra CM-designate Devendra Fadnavis says, " the swearing-in ceremony of the new government will be held tomorrow at 5.30 pm in the presence of prime minister narendra modi... we will decide by evening who all will take oath tomorrow. yesterday i met eknath… pic.twitter.com/jmn9c6JJEx
— ANI (@ANI) December 4, 2024
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, "महायुतीचं सरकार स्थापन करण्याची राज्यपालांना परवानगी मागितली. उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी होईल. अडिचवर्षापूर्वी देवेंद्रजींना मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून शिफारस केली होती. आज मी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं शिफारसपत्र राज्यपालांना दिलं. आपण भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला पूर्ण अधिकार दिले होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतंय. यापूर्वी महायुतीला असं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. यावेळी ऐतिहासिक आणि देदिप्यमान असा विजय मिळाला. आम्ही एक टीम म्हणून काम करत होते. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे. आम्ही अनेक थांबवलेले प्रकल्प महायुतीनं तत्काळ मार्गी लावले. त्याची उद्घाटनंही केली. आम्ही विकास कामं केलेली पाहून समाधान वाटतं. विकासाबरोबर लोककल्याणकारी योजना राबवून कामं केली. केंद्रातूनही मोठी मदत मिळत होती. त्यामुळे हे सगळं साधता आलं. मतदारांना धन्यवाद."
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण शपथ घेणार असल्याचं यावेळी शिंदे बोलताना मध्येच सांगितलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, अजित दादांना सकाळच्या शपथविधीची सवय आहे आणि संध्याकाळीही त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांना या गोष्टींचा चांगलाच अनुभव आहे. अशी टोलेबाजी झाली. तर आता पाच वर्षे राहणार आहे, असं अजित पवार यांनी ठासून सांगितलं.
आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मला मिळाला. त्यांना पूर्वीचाही अनुभव आहे. आता ते पुन्हा जोमानं काम करतील. यापुढेही त्यांना शुभेच्छा. तसंच देवेंद्र फडणवीस यांना यावेळी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रपिदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची भाजपा विधिमंडळ गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी साडे पाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर अनुमोदन आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांनी दिलं. एकच प्रस्ताव आल्यानं सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्याचं गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे पक्षनिरीक्षक विजय रुपाणी यांनी सांगितलं.