हैदराबाद : Xiaomi नवीन साउंड आउटडोअर स्पीकर भारतात लॉंच करण्यास तयार आहे. कंपनीनं स्वतः याबाबत लॉंच तारीख जाहीर केली आहे. हे साउंड 9 डिसेंबर रोजी Redmi Note 14 सीरीज स्मार्टफोनसह लॉंच होतील. जाणून घ्या स्पीकरमध्ये काय असेल खास
Experience big, clear audio anywhere with the Xiaomi Sound Outdoor 🎶🎧#Music #Buildings #Speaker pic.twitter.com/yJBLHA7zoe
— Xiaomi USA (@XiaomiUSA) November 21, 2024
वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पीकर : तुम्ही संगीताचा आनंद घेण्यासाठी पोर्टेबल स्पीकर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. Xiaomi नवीन पोर्टेबल आउटडोअर स्पीकर भारतात लॉंच करणार आहे. कंपनीनं एप्रिल 2024 मध्ये त्यांचे दोन नवीन वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पीकर Xiaomi Sound Pocket आणि Xiaomi Sound Outdoor जागतिक बाजारात लॉंच केले होते. आता Xiaomi भारतात साउंड आउटडोअर स्पीकर लॉंच करत आहे.
आउटडोअर स्पीकरची वैशिष्ट्ये : लाल, काळा आणि निळा या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये कंपनी भारतीय बाजारपेठेत स्पीकर लॉंच करण्याच्या तयारीत आहे. हे साउंड पॉकेट मॉडेलसारखे कॉम्पॅक्ट नसले तरी पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला IP67 रेटिंग देण्यात आली आहे. म्हणजेच, पाऊस किंवा धूळीपासून साउंडला खराब होण्याची चिंता नाहीय. तुम्ही बाहेर जाताना हे साऊंड सोबत वापरू शकता. Xiaomi 9 डिसेंबर 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत Redmi Note 14 मालिकेसह साउंड आउटडोअर स्पीकर लॉंच करेल.
2600mAh बॅटरी : हा पोर्टेबल स्पीकर त्याच्या सबवूफर, ट्वीटर आणि दोन पॅसिव्ह रेडिएटर्समधून 30W ध्वनी आउटपुट देण्याची शक्यता आहे. यात मजबूत बास मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यात 2600mAh बॅटरी आहे, जी 50 टक्के व्हॉल्यूम सेटिंगमध्ये 12 तासांपर्यंत टिकू शकते, असं कंपनीनं म्हटलंय. हे साऊंड चार्ज करण्यासाठी सुमारे 2.5 तास लागतात. हे मॉडेल ब्लूटूथ 5.4 ला सपोर्ट करतात, जे स्टिरिओ साउंडसाठी दुसऱ्या स्पीकरशी कनेक्ट होऊ शकतात. मोठ्या स्पीकरशी देखील कनेक्ट होऊ शकते. या स्पीकरची बॉडी अतिशय मजबूत असून वजन देखील हलके आहे. त्यामुळं ते सहजपणे कुठेही नेलं जाऊ शकतं. सुलभ पोर्टेबिलिटीसाठी यात रबराचा पट्टा आहे. स्पीकरमध्ये मायक्रोफोन देखील आहे, ज्याद्वारे तुम्ही कॉल देखील करू शकता.
हे वाचलंत का :