ETV Bharat / state

नाशिक : एमबीबीएस परीक्षेचा पेपर फुटला, 19 डिसेंबरला फेरपरीक्षा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एमबीबीएस परीक्षेचा एक पेपर फुटला. आता या पेपरची परीक्षा 19 डिसेंबरला पुन्हा घेण्यात येईल.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 10 hours ago

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्माकोलॉजी-1 विषयाचा पेपर मंगळवारी परीक्षेच्या तासभर आधीच सोशल मीडियावर फुटला. विद्यापीठाला याची माहिती मिळताच पेपर तत्काळ रद्द करून या विषयाची फेरपरीक्षा 19 डिसेंबरला ठेवली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 100 केंद्रावर 5 हजार 900 विद्यार्थी पेपर देणार होते. आता चौकशीसाठी विद्यापीठस्तरीय समिती नेमण्यात आल्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत हिवाळी सत्रातील परीक्षांचा दुसरा टप्पा दोन डिसेंबर पासून सुरू झाला आहे. राज्यातील 50 परीक्षा केंद्रावर 16 डिसेंबर पर्यंत या परीक्षा चालणार आहे. यामध्ये 3 डिसेंबरला दुपारच्या सत्रात एमबीबीएस दुसऱ्या वर्षाचा फार्माकोलॉजी-1 विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधीच सोशल मीडियावर फुटला. त्यामुळे विद्यापीठामार्फत हा झालेला पेपर ग्राह्य धरला जाणार नाही. तसंच 19 डिसेंबरला पुन्हा या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. यासंदर्भात कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक घेऊन या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी हा पेपर पुन्हा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

विद्यार्थ्याने ई-मेलने दिली माहिती - पेपर फुटल्याची माहिती एका विद्यार्थ्याने विद्यापीठाला एका ई-मेलद्वारे दिली. पहिल्या प्रश्नात उपविभागातील काही उत्तरे व्हायरल झाली होती. या संदर्भात परीक्षा मंडळाची तत्काळ बैठक घेऊन या विषयाची फेरपरीक्षेचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितलं.

सायबर सेलला तक्रार करणार - या विषयाची सायबर सेल अंतर्गत चौकशी केली जाईल. म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेशही विद्यापीठाने संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रमुखांना दिले आहेत अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू यांनी दिली.

हेही वाचा..

NEET पेपर लीकवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पुन्हा परीक्षा होणार नाही - NEET Paper Leak

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.