विशाखापट्टणम बंदरात अग्नितांडव; 40 बोटी जळून खाक, पाहा व्हिडिओ - port in visakhapatnam

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 10:25 AM IST

विशाखापट्टणम Fire Accident in Visakhapatnam Fishing Harbor : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात रविवारी रात्री भीषण आग लागलीय. या आगीत तब्बल 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत. मासेमारीसाठी या बोटी ठेवण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांच्या मदतीनं तासाभराच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशाखापट्टणम येथील बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीला काल रात्री अचानक आग लागली. ही आग वेगानं पसरली आणि शेजारी उभी असलेली दुसरी बोट त्यात अडकली. याठिकाणी सुमारे 40 बोटी उभ्या होत्या. या बोटींसह समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची तयारी सुरू होती. ही आग इतकी वेगानं पसरली की एकामागून एक अनेक बोटी त्यात अडकल्या. अशा प्रकारे आगीत 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.