Three leopard cubs त्या तिन्ही बछड्यांना मादीने नेले सुरक्षित स्थळी; सीसीटीव्हीत प्रसंग कैद - Female took all three calves to safety

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 7, 2022, 10:25 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

नाशिकच्या पाथर्डी शिवारातील वाडीचे रान परिसरात डेमसे यांच्या मळ्यात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळले Three leopard cubs were found. रविवारी तब्बल आठ तासांच्या प्रतीक्षेनंतर मादी सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. बछड्यांची व त्यांच्या आईची गाठ घालून देण्यात वनविभागाला यश आले forest department was successful आहे. ही घटना वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात कैद झाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत तिन्ही बछड्यांना शेतातच नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठिकाणी ठेवले. साधारण एक महिना वयाचे हे नर जातीचे तीन बछडे होते. यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर त्यांना त्याच ठिकाणी एका कॅरेट मध्ये ठेवण्यात आले होते. मादीच्या हालचाली टिपण्यासाठी वनक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव यांनी मळ्यामध्ये तीन ट्रॅप कॅमेरे व ३६० डिग्रीमध्ये फिरणारा एक ऑनलाइन कॅमेरा बसवला होता. बछड्यांना शोधण्यासाठी मादी येणार असल्याने वनविभागाने शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क केले होते. अखेर रविवारी रात्री मादी शेतात आली आणि आपल्या तिघा पिलांना घेऊन गेली. मादीचे आणि बछड्यांची पुन्हा गाठभेट झाल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या भागात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.