Farmer Turned Plow On Soybean Crop: वैतागून शेतकर्यानं फिरवलाय चार एकर सोयाबीन पिकावर नांगर, पाहा शेतकर्याची व्यथा
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर Farmer Turned Plow On Soybean Crop: संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील सुरेश गोपीनाथ भागवत या तरूणानं जुलै महिन्यात त्याच्या चार एकर क्षेत्रात सोयाबीन पेरले होते. यासाठी त्यांचा जवळपास पन्नास हजार रूपयांहून अधिक खर्च झाला होता. सुरूवातीला थोड्याफार प्रमाणावर झालेल्या पावसानं सोयाबीनचं पिक अतिशय चांगलं उतरून आलं होतं. मात्र, त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं सोयाबीन पिकाची वाढ झाली नाहीय. त्यामुळं शेतकर्यावर अक्षरशः चार एकर क्षेत्रात केलेल्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आलीय. पावसाअभावी परिसरातील शेतकर्यांचं सोयाबीन पिक वाया गेलंय. सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालीय, असं त्यांनी सांगितलंय. सरकारनं लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, जेणेकरून शेतकर्यांना दिलासा मिळेल, असंही यावेळी शेतकरी सुरेश भागवत सांगितलंय. (drought in ahmednagar district)