Sadabhau Khot On BRS : चांगले दाखवायचे अन् वाईट झाकून ठेवायचे, BRS पक्षावर सदाभाऊ खोतांची टीका - former minister Sadabhau Khot
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-06-2023/640-480-18822514-thumbnail-16x9-khot.jpg)
पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे जाळे महाराष्ट्रात पसरवण्यास सुरुवात केली आहे. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी BRS मध्ये सामील झाल्यामुळे, पक्ष राज्यभर व्यापक प्रचार करत आहे. बीआरएस प्रभाव राज्यात वाढत आहे. आप की बार किसान की, सरकार या घोषणांबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे जाहीरनामे, घोषणा गोंडस असतात. त्या दिसायला खूप सुंदर आहेत. भारत राष्ट्र समिती शेतकऱ्यांच्या बाजूने होती तर त्यांनी कृषी विधेयकाला विरोध कसा केला? असा प्रश्न त्यांनी केला. त्याचे उत्तर आगोदर BRS ने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. केसीआर यांच्यावर टीका : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात दुधाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सदाभाऊ खोतही उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, एकदा पक्षाची नोंदणी झाली की प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या देशात इतके पक्ष आहेत की त्यांची यादी करणे कठीण होईल. राज्यात बीआरएस पक्ष आला तरी काही फरक पडणार नाही असे देखील खोत म्हणाले. तिथे जे चांगले आहे ते दाखवत आहेत. त्यांचे मुख्यमंत्री आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना आमचा ऊस, द्राक्षे, डाळिंब दाखवू. दाखवायला काहीच लागत नाही. फक्त चांगले दाखवा, वाईट झाकून टाका अशी टीका देखील त्यांनी केसीआर यांच्यावर केली.