रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शिरवळ पोलिसांनी केली धरपकड; शहरातून काढली धिंड, पाहा व्हिडिओ - आरोपींची धिंड सातारा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 22, 2023, 4:27 PM IST
सातारा Fair of criminals In Satara: तरुणांकडून सातत्याने होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शिरवळमध्ये घडली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्यानंतर शिरवळ पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. (molestation of young Girl) निर्भया पथकासह शिरवळ पोलिसांनी छेडछाड करणाऱ्या टोळक्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांची धिंड काढली. (arrest of criminals) पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमाजी केंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाई केली आहे. (criminals on record) ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची पोलीस स्टेशन परिसर, एसटी बसस्थानक परिसर, मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह, चावडी चौक, बाजारपेठ, रामेश्वर परिसरातून धिंड काढण्यात आली. यापूर्वीही पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांची शहरातून धिंड काढली होती.