Eknath Shinde on President Rule : राष्ट्रपती राजवट लागू करण्याची बाळासाहेब थोरातांची मागणी हास्यापद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी रात्री नवी मुंबईत त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. एक वर्षानंतर मी नवी मुंबईत आलो आहे. हे शक्ती प्रदर्शन नाही, तर समर्थकांचे प्रेम आहे. नवी मुंबई हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, असे मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बाळासाहेब थोरात यांची मागणी हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आमच्याकडे 210 आमदारांसह पूर्ण बहुमताचे सरकार आहे, अशा स्थितीत ही मागणी करणे हास्यास्पद आहे. अशा स्थितीत एका मोठ्या नेत्याने असे विधान करणे हास्यास्पद आहे.