रोहिणी खडसेंवरील हल्लेखोर अद्याप मोकाट, जळगाव पोलिसांविरोधात खटला दाखल करणार - एकनाथ खडसे - जळगाव पोलीस कारवाई एकनाथ शिंदे प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - रोहिणी खडसे यांच्या गाडीवर सहा महिन्यांआधी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची चौकशी नाशिक आयुक्तांकडे देण्यात आली होती. मात्र, तेथील आयुक्त बदलून गेले. तरीही ही चौकशी राजकीय दबाव असल्याने पूर्ण झालेली नाही. यातील हल्लेखोर हे अद्यापही मोकाट फिरत असून दोन दिवसांआधी झालेल्या मुक्ताईनगरातील हाणामारीत हेच गुन्हेगार होते. हे सर्व दिसत असले तरी पोलीस कुठलीही कारवाई करत नसून, पोलीस राजकीय दबावापोटी घाबरत आहेत. यामुळे मी पोलिसांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात खटला दाखल करणार आहे. राजकीय दबाव कोणाचा आहे याचे सर्व पुरावे देखील आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत, असे मत माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST