Ekanath Khadase on Ashish Shelar : आशिष शेलार यांच्या गौप्यस्फोटावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले... - देवेंद्र फडणवीस
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - भाजप नेते आशिष शेलार यांनी 2017 मध्ये भाजप राष्ट्रवादी युती होणार होती. त्यास मात्र शिवसेनेने विरोध केला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse ) यांनी प्रतिक्रिया देत 2014 मध्ये भाजप शिवसेना वेगळी लढली. मात्र, 2019 मध्ये भाजप शिवसेना एकत्रित लढली जर 2017 मध्ये भाजप राष्ट्रवादीच्या युतीला शिवसेनेकडून विरोध होता. तर मग 2019 मध्ये भाजप शिवसेना एकत्रित निवडणूक का लढलवली.?, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. अशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) हे अर्धसत्य सांगत असून 2019 मध्ये झालेल्या भाजप शिवसेना एकत्रित निवडणुकीत अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र, त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. त्याचवेळी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हे ठरले असते तर मुख्यमंत्रीपदाच्या विवादामुळे युती तुटली नसती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST