Earthquake Tremors In Hingoli : हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; पंधरा ते सोळा गावात जमिनीतून आला गूढ आवाज - हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 15, 2023, 3:48 PM IST

हिंगोली : हिंगोलीतल्या औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील काही भागांमध्ये आज पहाटे 5.12 आणि सकाळी 7.04 व वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. 3.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे. ओंढा आणि कळमनुरी तालुक्यातील पंधरा ते सोळा गावांमध्ये एका पाठोपाठ दोन धक्के जाणवले. त्यामुळे या भागातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, कंजारा, पूर, काकडधाबा, फुलदाभा, नांदापूर, पांगरा शिंदे, कुरुंदा सिंदगी, पोतरा, लक्ष्मणनाईक तांडा, तांमटीतांडा, कुपटी, वापटी, हिंगणी, खेड आदीसह हिंगोली शहरामध्येही काही भागात धक्के जाणवले आहेत. गावकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला अनेकदा जमिनीतून येणाऱ्या गूढ आवाजाची माहिती दिली. मात्र प्रशासनाकडून अद्याप पर्यंत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. भूकंपाच्या घटनेने येथील नागरिक भयभीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.