Doctors gave life ह्रदय बंद पडलेल्या वृध्देला डॉक्टरांनी 'असे' दिले पुनर्जीवन, पाहा व्हिडिओ - डॉक्टरांनी दिले पुनर्जीवन
🎬 Watch Now: Feature Video
वैद्यकीय तपासणीसाठी खासगी रूग्णालयात आलेल्या वृध्देची कार्डियाक अरेस्टने ह्रदयक्रिया (who suffered cardiac arrest due to a heart attack) बंद पडली. यावेळी डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचार्यांनी दीड मिनिटे केलेल्या कार्डियाक मसाजमुळे ह्रदयक्रिया पुन्हा सुरू होऊन; वृध्देला पुनर्जीवन (Doctors gave life to an old woman) मिळाले. ही संपुर्ण घटना रूग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुगर आणि ह्रदयविकाराचा आजार असलेली अंबक चिंचणी (ता. कडेगाव, जि. सांगली) गावातील वृध्दा तपासणीसाठी कराडमधील ह्रदयरोग तज्ज्ञ दिलीप पाटील यांच्या रूग्णालयात आली होती. वृध्द महीला रूग्णालयातील बाकावर बसल्या असतांना, कार्डियाक अरेस्टने त्यांची ह्रदयक्रिया अचानक बंद पडली. ही बाब लक्षात येताच ओपीडी थांबवून डॉ. दिलीप पाटील यांनी कर्मचार्यांच्या मदतीने दीड मिनिटे त्यांच्या छातीवर कार्डियाक मसाज (पंपिंग) केला आणि वृध्देची ह्रदयक्रिया पुन्हा सुरू झाली. डॉ. पाटील यांनी आपल्या वैद्यकीय अनुभवाच्या जोरावर वृध्देला पुनर्जीवन (Doctors gave life) दिले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात डॉ. दिलीप पाटील यांचे कौतुक होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST