Diwali Padwa 2023 : सारसबाग येथे तरुणांची तुफान गर्दी, धोकादायक चायनीज आकाशकंदील उडवून पाडवा साजरा - young people flying Chinese sky lanterns in pune
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 14, 2023, 9:33 AM IST
पुणे : Diwali Padwa 2023 सध्या सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीमध्ये नवा उत्साह असून दिवाळी पाडव्याला शहरातील मंदिरांसह विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. पुण्यातील सारसबाग येथील तळ्यातील गणपती म्हणजेच सारसबाग येथील मंदिरामध्ये हजारो पणत्या प्रज्वलित करून सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याची पुणेकरांची प्रथा आहे. भल्या पहाटे दीपोत्सवासाठी आणि पाडवा पहाट कार्यक्रमासाठी मंदिरामध्ये भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणत येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं पुण्यातील सारसबाग येथे जत्रेचं स्वरूप आलं आहे. सारसबागेत धोकादायक चायनीज आकाशकंदील उडवून, सारसबाग येथेच फटाके फोडून पाडवा साजरा केला जातं आहे. दोन दिवसापूर्वी पुणे शहरात लक्ष्मी पूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. त्यामुळे शहरात जवळपास 23 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. असे असताना सारसबाग परिसरात धोकादायक आकाश कंदील उडविले जात आहेत.