Diwali 2023 : दिव्यांग मुलांनी रंगविल्या पणत्या; लक्षवेधून घेणाऱ्या पणत्यांनी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन - disabled children painted panti
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 5, 2023, 1:32 PM IST
ठाणे : निसर्गानं जन्मतः अन्याय केलेल्या या मुलांना सणाचं महत्व कळावं आणि त्याचा पुरेपूर आनंद लुटता यावा यासाठी, या संस्थेचे संस्थापक किरण नाकती यांनी अभिनव संकल्पना राबविली आहे. परावलंबी जीवन न जगता या मुलांना स्वाभिमानानं ताठ मानेनं समाजात वावरता यावं, यासाठी ही संस्था कार्य करते. अविनाश धोमसे या दिव्यांग कला केंद्रातील कलाकारानं आपल्या कल्पकतेचा वापर करत पणत्या सजविल्या. त्याचाच कित्ता गिरवत बाकीच्या मुलांनीदेखील या पणत्यांची सुबक आणि आकर्षक सजावट केली. किरण नाकती यांनी देखील मुलांमधील हे उपजत गुण लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहित करत मार्गदर्शन केलं. या मुलांनी जवळजवळ 600 हून अधिक पणत्यांची सजावट केल्यानं नागरिकांनी या पणत्यांची खरेदी केली. या दिव्यांग मुलांचा सण आनंदानं आणि उत्साहानं साजरा करण्यास हातभार लावावा असं आवाहन दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नाकती यांनी नागरिकांना केलं.