Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक, विखे पाटलांवर भंडारा उधळला; Watch Video
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 8, 2023, 11:16 AM IST
सोलापूर : Dhangar Reservation : राज्याचे महसूल मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करत धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळला. शुक्रवारी सकाळी विखे पाटील रेस्ट हाऊसमध्ये बैठक घेत होते. तेव्हा शेखर बंगाळे यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी विखे पाटलांची भेट घेतली. त्यावेळी भेटीदरम्यान त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. या घटनेनंतर उपस्थित लोकांनी शेखर बंगाळे यांना ताबडतोब थांबवत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर पोलीस त्यांना सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या घटनेनंतर शासकीय विश्रामगृहात एकच गोंधळ उडाला होता. पहा या घटनेचा हा व्हिडिओ.