Video आदिमाया देवीच्या मिरवणुकीतील चंडा ताल वाद्याने भाविक मंत्रमुग्ध - Adimaya Devi procession in Karad
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16588064-1110-16588064-1665225788376.jpg)
कराडमधील नवदुर्गांपैकी स्वयंभू मानल्या जाणाऱ्या श्री आदिमाया देवीच्या मंदिराचा यंदा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. 1972 साली नवरात्रोत्सव काळात भोई गल्लीमध्ये उत्खननात आदीमाया देवीची मूर्ती सापडली idol Adimaya Devi found in Bhoi होती. त्याच ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करून मंदिर बांधण्यात आले होते. त्या मंदिराचा यंदा सुवर्ण महोत्सव Golden Jubilee Celebration of Devi induction होता. यानिमित्त मागील नऊ दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. मंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आदिमाया देवीची कराड शहरातून भव्य दरबार मिरवणूक Adimaya Devi procession in Karad काढण्यात आली. केरळचे प्रसिद्ध चंडा वाद्य हे दरबार मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. वादन पथकातील कलाकारांनी भाव अणि मुद्रा यांच्या समन्वयाने तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे पौराणिक कथेचे सादरीकरण केले. केरळी चंडा वाद्य आणि कलाकारांचा नृत्याविष्कार पाहून कराडकर मंत्रमुग्ध Chanda instrument special attraction in procession झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST