Har Ghar Tiranga Scene : मलकापुरात घरगुती गणपतीसमोर देशमुखे कुटुंबाने साकारला 'हर घर तिरंगा' देखावा, पाहा व्हिडिओ - देशमुखे कुटुंबाने साकारला हर घर तिरंगा देखावा
🎬 Watch Now: Feature Video
सातारा : यंदा संपूर्ण देशभर स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव दणक्यात साजरा झाला. यानिमित्ताने अमृत महोत्सवावर ( Amrit Mahotsav Concept of Ganeshotsav ) आधारित उपक्रम राबविण्यात आले. याच संकल्पनेवर मलकापूर (ता. कराड) येथील सुभाष देशमुखे यांच्या कुटुंबीयांनी आपल्या घरातील ( Subhash Deshmukhe Created a Har Ghar Tiranga ) गणपतीसमोर टुमदार गाव उभारून 'हर घर तिरंगा' देखावा साकारला आहे. कागद, पुठ्ठ्यांचा वापर करून घरे, ग्रामपंचायत इमारत, पाण्याची टाकी, शाळा, मंदिर, विहीर, सेल्फी पॉईंटही उभा केला आहे. स्वातंत्र्यदिनी ज्याप्रमाणे देशात घरांवर तिरंगा फडकविण्यात आला. त्याप्रमाणे गणपतीसमोरील या देखाव्यातील घरांवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा देखावा साकारण्यात आला आहे. माती आणि नैसर्गिक रंगातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे देशमुखे कुटुंबातील समृद्धी, राजवीर, समीक्षा आणि रणवीर या बालचमूंनीदेखील कागदी घरे बनवून देखाव्याला हातभार लावला आहे. हा देखावा मलकापूर शहरात चर्चेचा ठरला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक देशमुखे यांच्या घरी गर्दी करीत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST