Iftar Program: लालू प्रसाद यादव यांच्या घरी इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन! इफ्तारला पार्टी म्हणल्याने भडकले तेजस्वी - Tejashwi Yadav

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 9, 2023, 10:34 PM IST

पाटणा (बिहार) : बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आपल्या निवास्थानी इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले आहेत. इफ्तार ही काही लोकांना पार्टी वाटते. मात्र, तसे नसून ती एक परंपरा आहे. मनोभावे लोकांना आपण जेवणासाठी आमंत्रीत करणे हा यातील भाव आहे असही ते म्हणाले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार हेही उपस्थित होते. दरम्यान, नितीश कुमार यांचे कट्टर विरोधक पप्पू यादव आणि चिराग पासवान हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकीकडे बिहार जळत आहे तर दुसरीकडे सरकार पार्टी करत आहे अशी टीका केली आहे. भाजपच्या या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. या आयोजीत इफ्तारमध्ये विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचे काम तेजस्वी यांनी केले आहे. ते म्हणाले की, काही लोक याला पार्टी म्हणत आहेत. मात्र, इफ्तार ही पार्टी नसून प्रार्थना आहे. आम्ही उपवास करणार्‍यांना आदर दाखवण्याचे काम करतो. मात्र, काही लोक याला इफ्तार पार्टीचे नाव देत आहेत. हिंसाचाराच्या प्रकरणी सातत्याने कारवाई केली जात आहे. कुणालाही यामध्ये सोडले जाणार नाही असही तेजस्वी यावेळी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.