Ajit Pawar : अजित पवारांची शरद पवारांवर 'नो कॉमेंट'; पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले... - Ajit Pawar on pm Narendra Modi
🎬 Watch Now: Feature Video


Published : Aug 28, 2023, 6:37 PM IST
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले. सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सातत्यानं अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत असताना आपण पाहिलं. पक्षाची जाहीर सभा असो की एखाद्या उद्घाटनाचा कार्यक्रम, अजित पवार हे नेहमीच मोदींचं कौतुक करत असताना दिसून आलं. सोमवारी (28 ऑगस्ट) देखील पुण्यात गणेश उत्सवासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत देखील अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांना शरद पवार यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर बोलणं यावेळी टाळल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्वकाही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. यावेळी अजित पवार हे माध्यमांवर चिडल्याचं दिसून आलं.