पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंदऐवजी क्लस्टरचा पर्याय घेऊ - दीपक केसरकर - Deepak Kesarkar on Advice of MP Supriya Sule
🎬 Watch Now: Feature Video
सांगली : पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करताना त्याला क्लस्टरचा पर्याय होऊ शकतो, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ( School Education Minister Deepak Kesarkar ) यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारकडून दोन ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवलेल्या पर्यायावर बोलताना, केसरकर यांनी क्लस्टरबाबतचा विचार ( MP Supriya Sule has Decided to Close Schools ) करण्याचे स्पष्ट केले आहे. ( Kesrkar Speaking on Suggestion by MP Supriya Sule ) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशन ( Golden Jubilee Session of MSEIC ) सांगलीमध्ये पार पडले आहे. या अधिवेशनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली होती. या अधिवेशनामध्ये महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारने कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर क्लस्टर हा पर्याय प्रभावी ठरू शकतो, असे मत मांडले. यावरून बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील क्लस्टर हा पर्याय प्रभावी ठरू शकेल. शाळा बंद करून त्याऐवजी त्या मुलांना वाहतूक खर्च देता येऊ शकतो. मुलांच्या दृष्टीने ते सोईस्कर ठरेल. त्यामुळे क्लस्टरच्या पर्यायावर नक्कीच विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. कोरोना काळातील शिक्षण संस्थाचालकांची फीची थकीत रक्कम म्हणून 200 कोटी मंजूर करण्यात आले असून, ते लवकरचं मिळेल,असेही स्पष्ट केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST