दिगंबरा दिगंबरा! दत्त जयंतीच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 12:15 PM IST

पुणे :  Datt Jayanti 2023  शहरातील विविध दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. पुण्यातील श्रीमंती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिराच्या बाहेर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. दिवसभर विविध कार्यक्रम असून संध्याकाळी महाप्रसाद तसेच दत्त जन्म सोहळा आयोजित करण्यात आलं आहे. दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर तसेच मंदिराचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते. दत्तमंदिर उत्सवाचे यंदा १२६ वे वर्ष असून श्री दत्त कलामंच येथे दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत भजन आणि सायंकाळी ५ ते १० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम झाले.   

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.