Pune Damini Squad : उशिराचे शहाणपण, पुण्यात दामिनी पथके तैनात, रात्रीच्या गस्तीत वाढ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मागच्या आठवड्यात पुण्यात दोन खळबळजनक घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांनी तडक कारवाई करत कामात दिरंगाई करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. आता पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलिसांचा रस्त्यावर जास्तीत जास्त वावर रहावा यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांनी कॉलेज, शाळा, क्लासेस व हॉस्टेल परिसरात दामिनी पथके तैनात केली आहेत. तसेच बीट मार्शलची गस्त देखील वाढवण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी नाकाबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यास सुरुवात केली आहे. तसेच दामिनी आणि बीट मार्शलची आजपासून प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. असे असले तरी या दामिनी पथकातील महिला आणि पुरुष पोलिसांपैकी कुणीच दुचाकीवरुन फिरताना हेल्मेट घातल्याचे दिसले नाही. त्यामुळे आता या पोलिसांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवले काय, अशीही विचारणा होत आहे.