Dahi Handi 2023 : महाराष्ट्रातील एकमेव अंध गोविंदा पथकानं लावला दहीहंडीचा थर - नयन फाऊंडेशन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 4:50 PM IST

मुंबई Dahi Handi 2023 : मुंबईत आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विविध ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमध्ये महिलांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. आयडियल बुक डेपो, दादर येथील दहीहंडी, सेलिब्रिटी दहीहंडी म्हणूनही ओळखली जाते. ही दहीहंडी बघायला मोठी गर्दी होत असते. यासोबतच सुविधा येथील दहीहंडी, मनसेची दहीहंडी, दादर परिसरातील दहीहंडी आकर्षणाचा विषय असते. आज सकाळपासूनच हंडीला सलामी देण्यासाठी गोविंदा पथकांची गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज नयन फाउंडेशन या अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं मुला-मुलींच्या दहिहंडीचं आयोजन केलं होतं. दादरमध्ये नयन फाऊंडेशन या अंध मुला-मुलींनी चार स्तरांचा मानवी मनोरा उभारून दहीहंडीला सलामी दिली. संस्थेच्या अध्यक्षांशी संवाद साधला असता त्यांनी "नयन फाउंडेशन संस्था अंध मुलांचा मनोरा रचणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. आम्ही मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. यावर्षी देखील आम्ही आमची परंपरा कायम राखत मुलं-मुलींचे थर लावले आहेत." अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.