Dagdusheth Ganapati Devotee: दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेल्या भक्तांनी दाखविली शिस्त आणि माणुसकी, पाहा व्हिडिओ - ambulance stuck in crowd

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 3:15 PM IST


पुणे Dagdusheth Ganesh Devotee: रविवार आणि गणेशोत्सव यामुळं  दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलीय. सकाळपासूनच पुणेकर भावी राज्यातील भावी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. शनिवार वाड्यापासून ते दगडूशेठ गणपती मंदिर रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलाय. एक रस्ता वन वे चालू करण्यात आलेला आहे. दुसरा रस्ता बाहेर पडण्यासाठी तयार करण्यात आलाय. त्यामुळं गर्दी लवकर कमी होण्यास मदत होत असल्याची माहिती पोलीस देत आहेत. परंतु गर्दी प्रचंड असल्यानं पेठांमधील रस्ते गच्च भरलेले आहेत. हजारोंच्या गर्दीमध्ये पुणेकर भक्तांनी माणुसकी दाखवत एका रुग्णवाहिकेला वाट करून दिलीय. शनिवार वाड्याकडून निघालेली एक रुग्णवाहिका गर्दीमध्ये अडकल्यानं रुग्णवाहिका बाहेर काढणं मोठं कठीण काम होतं. परंतु पोलिसांनी आणि नागरिकांनी मिळून या रुग्णवाहिका वाट करून दिलीय. तातडीनं ही रुग्णवाहिका पुढे निघून गेली. त्यामुळं गणेश भक्तांचं सर्वत्र स्वागत होतंय. पोलिसांचं सुद्धा कौतुक केलं जातंय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.