Aurangabad Crime : धक्कादायक! युवती दुसऱ्या मुलासोबत दिसली; युवकाने भर रस्त्यात चोपले, व्हिडिओ व्हायरल - तरुणाची तरुणीला बेदम लाथा बुक्क्यांनी मारहाण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 1, 2023, 10:23 PM IST

Updated : Aug 2, 2023, 3:15 PM IST

औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगरमध्ये तरूणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. समाज माध्यमांवर तो चांगलाच व्हायरल होत आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथील घटना असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून भांडणवाली लव स्टोरी अशी चर्चा रंगत आहे. प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीला बेदम लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लोक बघत आहेत, अशी ती ओरडत राहिली, मात्र तो मारतच राहिला. तरुणीकडून सोडण्याची विनंती होत होती, मात्र तरुण लाथा बुक्क्यांनी मारहाण करत राहिला. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याचा आरोप करत तरुणीला मारहाण केल्याची चर्चा रंगली आहे. ही घटना होत असताना कोणीही मध्ये पडले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर या व्हिडिओची ईटीव्ही भारत पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ केव्हा व्हायरल झाला हेही सांगता येत नाही. 

Last Updated : Aug 2, 2023, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.