Mushfiqur Rahim Father : भारत-बांगलादेश सामन्याबद्दल मुशफिकूर रहीमच्या वडिलांची EXCLUSIVE मुलाखत; म्हणाले... - IND Vs Ban Bangladesh
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 19, 2023, 2:25 PM IST
|Updated : Oct 19, 2023, 2:59 PM IST
पुणे IND Vs Ban Bangladesh : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला ( Cricket World Cup 2023 ) सुरुवात झाली असून यंदाचा विश्वचषक भारतात होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचे दहा सामने होणार आहेत. त्यातील पाच सामने हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहेत. तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना होत आहे. या सामन्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं प्रेक्षक सामना बघण्यासाठी आलेले आहेत. यावेळी क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर ईटीव्ही भारतनं बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याचे वडील महेबुब हबीब यांच्यासोबत खास संवाद साधला आहे. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम हा चांगली फलंदाजी करणार असल्याचा विश्वास त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.