भारताच्या पदरी हार येताच चिमुकली लागली रडायला; पाहा व्हिडिओ - मोदी स्टेडियमवर भारताचं स्वप्न भंगलं
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 19, 2023, 10:39 PM IST
मुंबई Cricket World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. टीम इंडियाला तब्बल 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी (India vs Australia World Cup) होती, मात्र ती हुकली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी (World Cup) जिंकली आहे. क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये जोरदार रंगला होता. तर गोलंदाजीमध्ये भारत हारला असला तरी अंतिम सामन्यापर्यंत झेप घेतली, यातच मुंबईकरांनी समाधान मानलं. मात्र हेड या क्रिकेटरने 137 रन करून ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात विश्वचषक खेचून आणलाच. भारताच्या पदरी हार आल्याने लालबाग मधील एक चिमुरडी रडू लागली तर सुमित घाटकरने भावुक होऊन दिली प्रतिक्रिया.